मानवमित्र ऑर्गनायझेशन च्या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत !!

14 July 2017

आंतकवादी झाडाझडती....

नजिकच्या काळात अमराथ याञवेर झालेला आंतकवादी हल्ला पुनश्च एकदा जागरुक, विकासभिमुख, महासत्ता बनू पाहणार्‍या हिंदुस्थानाच्या लखलखकीत डोळ्यात अंजन घालुन गेला. दैवाच्या दारात आलेल मरण म्हणून काहींनी मुक्तीचा मार्ग दाखवला, तर काहींनी सुरक्षा मध्ये झालेल्या चुकांचे धिंडवडे काढले, पण या मध्ये आंतकवादी त्यांचे कर्म करुन आपल्याला चर्चेला विषय देवून वेगळे झाले. मा. प्रधानमंञी यांच्या अथक प्रयत्नाना दोष देवून चहाचा चुस्का ओढणार्‍यांनी तोंडाचा कडवढपणा जरी कमी केला तरी काहीतरी बर चाललय याची जाणिव तरी लोकांना होईल, सतत होणार्‍या गोष्टीवर नकारअर्थी सुर लावणे योग्य नाही. 9/11 च्या हल्यानंतर सुडाच्या भावनेतून आंतकवाद पुरस्कर देशांना घाम फोडणार्‍या अमेरिकेची धडकी ही अमेरीकन लोकांच्या एकसंघ वागणूकी मुळे जास्त भयावह झाली होती. भारतीय लोकशाही तर यां पेक्षा किती तरी मजबूत आहे, एक वैचारीक पणा जर दाखवला तर कोण्या परक्याची वाईट हेतूने हिंदूस्थानात पाय ठेवायची हिंमत होणार नाही. पण आपण जास्त आपसात भांडण करण्यातच रमतो. ज्या प्रकारे आपण आपल्या आई बाबा वर विश्वास ठेवतो, त्या मध्ये आपण कधीच विचार करत नाही, की हा निर्णय फायदेशीर की वाईट, आपला फक्त विश्वास असतो. तसाच विश्वास आपण आपल्या राज्यकर्ते, सुरक्षारक्षका वर ठेवयला हवा. मग त्यात कधी जात येतील ना धर्म. कारण आंतकवादात ना धर्म असतो. जर आंतकवादात धर्म असता तर पाकिस्तानात हल्ले झालेच नसते, ना माणुसकीत धर्म असतो, जर असता तर पाकीस्तानात शाळेवर झाले हल्लावर भारतीय शांळानी शोकसभा घेतल्याच नसत्या..वेळ आहे फक्त विचार एकसंघ, आणखी एकजुट होण्याचा घ्यायचा आहे.
जय हिंद......

- सु . का . दळवे

18 April 2017

डॉ बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते छत्रपती उदयनराजे भोसले दिनदर्शिकेचे अनावरण संपन्न

*जेष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते छत्रपती उदयनराजे भोसले दिनदर्शिकेचे अनावरण संपन्न.*
दरवर्षी प्रमाणे मानवमित्र ऑर्गनायझेशन व छत्रपती फाऊंडेशन कडुन प्रकाशित  होणाऱ्या  छत्रपती उदयनराजे भोसले दिनदर्शिकेच्या सलग दुसऱ्या  आवृत्तीचे  चे अनावरण काल दिनांक ३०/१२/२०१६ रोजी पुणे येथे  *छत्रपती उदयनराजे भोसलेे यांचे गुरुतुल्य तथा राजेंचे राजकीय सल्लागार तथा  नाबार्ड चे माजी अध्यक्ष, राहुरी कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व भुमाता ब्रिगेड चे संस्थापक व अध्यक्ष, जेष्ठ कृषी तज्ञ  सन्मानानिय डॉ. बुधाजीराव मुळीक साहेब तसेच  अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा तथा भुमाता महिला ब्रिगेडच्या श्रीमती. कमल सावंत मॅडम, व  बि. एस. मल्टीट्रेडर्स प्रा. लि. च्या डायरेक्टर  श्रमाती. योगिनी दुधुस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.* त्यावेळी मानवमित्र ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष श्री.अजित शिंदे, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. अमोलजी वाळके , संस्थचे सदस्य तथा जिजाऊ प्रतिष्ठाण चे संस्थापक व अध्यक्ष श्री. देवीसिंह शिंदे यांच्या प्रमुख  उपस्थिती मध्ये हा अनावरण सोहळा संपन्न झाला.

About