शिंगणापुरमध्ये शनिमंदीराची स्थापना नेमकी कधी झाली याबद्दल तिथले स्थानिक, हिंदुत्ववादी संघटना, भाविक आणि प्रशासन यांच्यात एकवाक्यता नाही. कोण म्हणतय तीनशे वर्षापुर्वी, कोण म्हणतय चारशे वर्षापुर्वी, कोण म्हणतय पाचशे वर्षापुर्वी तर कोण म्हणतय ही अनादी काळापासुन चालत आलेली परंपरा आहे. आमच्याकडं चार पाच वर्षापुर्वी बाळुमामाची मेंढरं आली होती. ती उभ्या पिकात चरायची. बाळुमामाची मेंढरं रानातुन फिरवली की पिक जोमात येतय असा त्यामागचा समज होता. आता दहा बारा खंडी मेंढरं उभ्या पिकात चरल्यावर पिकाच वाटुळ होईल का ते जोमाने येईल? पण तरीही ती उभ्या पिकात चरायची. त्याच काळात बाळुमामावर पिक्चरपण आलता. आपल्याकडे प्रथा परंपरांचा शिरकाव कसा होतो याच हे उदाहरण आहे. मार्गशीर्षातले गुरवार, सत्यनारायण, नागबली याही याच पठडीतल्या प्रथा आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात अशा कुठल्याही प्रकारच्या प्रथा नव्हत्या. शिवरायांच्या समकालीन इतिहासात विठ्ठल, खंडोबा, ज्योतीबा, भवानीमाता आणि ग्रामदैवतांचा उल्लेख आढळतो..
क्रमश :
www.manavmitra.in
No comments:
Post a Comment