'पोलीस' म्हणजे् दरारा,समाज मान्य भीती पण काल परवाच्या नितीभ्रष्ठ घटणानी समाज पुन्हा विचार करतोय. बांद्रा वाहतूक विभागाचे विलास शिंदे(वय-५०),PSI नितिन डगळे(वय-३८) कोळसेवाडी पो.स्टे. कल्याण.असे अनेक उदाहरण आपल्या समोर आज आहेत.विलास शिंदेना तर यात आपला लाखमोलाचा जिव गमवावा लागला,हाच समाजव्यवस्थेचे पराभव बोलावा लागेल.
सदर घटनाध्ये तरुण वर्गाचा सहभाग शक्तीदर्शक होता हे माञ प्रखर दिसुन येते.मनमानी कारभाराला सणासुदीच्या दिवसात पोलीस व्यवस्थेकडून होणार विरोध किंवा मनात पूर्व ग्रह धरुन होणारा हल्ला हे मुळ असावे. सदर किंवा इतर घटना मध्ये समाज सरसकट विचार करुण मोकळा होतो.मुळ कारण किंवा कायम उपाय यांच्या पर्यंत जाण्यासाठी समाजाला सवड हि क्वचितच मिळते. सवड मिळण्या साठी दिल्ली निर्भया यां सारखी प्रकरण किंवा यासारख्या गंभीर प्रकरणांची,समाज जागे करण्या साठी गरज पडते हेच दुःख. आधुणिक व शक्तीशाली म्हणुन मिरवायचे स्वप्न टप्प्यात असताणा घरातल्या संरक्षक भिंतीना भगदाड तर पडणार नाही ना,याची काळजी आत्ताच घेतलेली चांगली.
पोलीसव्यस्थेकडून दर्शवित घडामोडी, समाज कोणत्या वैचारीक मार्गाने आत्मसात करेल हे कळणे हेही धुसर असते, पण करण्यात येणारा उपाय समाजहिताचाच आहे हे जर पोलीसव्यस्थेकडूणच कळाले तर उपाय हिताचे येतील हे नक्की, पण या मध्ये समाजामधिल पोलिस जरब कायम व आधिक भक्कम होणे गरजेचे आहे. गरम रक्ताची गरमी भलतीकडेच वळणे हे ही संकाटापूर्वीच्या वादळाची चाहूल नाही ना हे समजुन घेण्याचे जाणकार लोंकासमोरचे आव्हानाकायम आहे.
जबाबदार समाज, आदर्श नागरीक म्हणून मिरवायचे स्वप्न उरात पाहणारा समाजाने स्वःता साठी नाहीतर नाही पण आपल्या वंशीय भविष्यासाठी तरी जागरुकतेची सुरुवात करायला हवी.त्याचबरोबर आपल्या संरक्षणासाठी कोणताच परीवारीक, सामाजीक,अर्थीक, सणांत सहभाग न घेता सदैव तत्पर संरक्षणार्थ उभा "पोलीस" दलाला प्रत्येक वेळेस आरोपीच्या ओळीत उभे करणे कितपत योग्य आहे हे आत्मसात स्वःता करुण घ्यावे करावे लागेल,त्याचबरोबर वेगाची कास धरुण वेगात युवा पिढी आधुनिक पणा भासवते पण अनुभवाची वेस अवळण्याची वेळ पौढ वरिष्ठावर आली आहे.
आदर्श समाजाच्या उभारणीसाठी सर्वा सोबत आणि अनुभवासोबत चालण्याची गरज नक्कीच आहे. त्यातुनच अभाधित शांतता जाणवेल. द्वेशाने ऐकमेकांत न गुंतता भविष्य रोख आणि स्पष्ट दिसेल.
सुदर्शन दळवे आडसकर.
शिक्षण व सहकार क्षेत्रात उच्च दर्जाचा प्रगतीसह प्रामाणिकपणे कष्ट करून बदल करणे. सर्व जाती धर्मातील बांधवांना आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकाराची जाणीव करून देऊन चरित्र्यसंपन्न, श्रजनशील, व्यसनमुक्त, सुसंस्कृत, धर्म निष्ट व एकसंघ समाजाची निर्मिती करणे व समाजाचे न्याय हक्क मिळवून देणे हे संस्थेचे मूळ उद्दिष्ट आहे.
11 September 2016
क्रतघ्न आपण......?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment