नजिकच्या काळात अमराथ याञवेर झालेला आंतकवादी हल्ला पुनश्च एकदा जागरुक, विकासभिमुख, महासत्ता बनू पाहणार्या हिंदुस्थानाच्या लखलखकीत डोळ्यात अंजन घालुन गेला. दैवाच्या दारात आलेल मरण म्हणून काहींनी मुक्तीचा मार्ग दाखवला, तर काहींनी सुरक्षा मध्ये झालेल्या चुकांचे धिंडवडे काढले, पण या मध्ये आंतकवादी त्यांचे कर्म करुन आपल्याला चर्चेला विषय देवून वेगळे झाले. मा. प्रधानमंञी यांच्या अथक प्रयत्नाना दोष देवून चहाचा चुस्का ओढणार्यांनी तोंडाचा कडवढपणा जरी कमी केला तरी काहीतरी बर चाललय याची जाणिव तरी लोकांना होईल, सतत होणार्या गोष्टीवर नकारअर्थी सुर लावणे योग्य नाही. 9/11 च्या हल्यानंतर सुडाच्या भावनेतून आंतकवाद पुरस्कर देशांना घाम फोडणार्या अमेरिकेची धडकी ही अमेरीकन लोकांच्या एकसंघ वागणूकी मुळे जास्त भयावह झाली होती. भारतीय लोकशाही तर यां पेक्षा किती तरी मजबूत आहे, एक वैचारीक पणा जर दाखवला तर कोण्या परक्याची वाईट हेतूने हिंदूस्थानात पाय ठेवायची हिंमत होणार नाही. पण आपण जास्त आपसात भांडण करण्यातच रमतो. ज्या प्रकारे आपण आपल्या आई बाबा वर विश्वास ठेवतो, त्या मध्ये आपण कधीच विचार करत नाही, की हा निर्णय फायदेशीर की वाईट, आपला फक्त विश्वास असतो. तसाच विश्वास आपण आपल्या राज्यकर्ते, सुरक्षारक्षका वर ठेवयला हवा. मग त्यात कधी जात येतील ना धर्म. कारण आंतकवादात ना धर्म असतो. जर आंतकवादात धर्म असता तर पाकिस्तानात हल्ले झालेच नसते, ना माणुसकीत धर्म असतो, जर असता तर पाकीस्तानात शाळेवर झाले हल्लावर भारतीय शांळानी शोकसभा घेतल्याच नसत्या..वेळ आहे फक्त विचार एकसंघ, आणखी एकजुट होण्याचा घ्यायचा आहे.
जय हिंद......
- सु . का . दळवे
No comments:
Post a Comment