मानवमित्र ऑर्गनायझेशन च्या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत !!

Event

                 दुर्ग संर्वधन चळवळ             
          आपनही यात सहभागी व्हा. व मोफ़त मिळवा

(टी-शर्ट, कैप, आय-डी कार्ड, लोगो स्टीकर, व सहभागी प्रमाणपत्र)         
           
                      किल्ले संवर्धन आराखडा :

१) लोकसहभाग= किल्ले संवर्धन किंवा जतन करणे हे कोणा एकट्याचे किंवा फक्त शासनाचे कर्तव्य आहे, असे नव्हे तर ते सर्वांचेच आहे. त्यासाठ्यी नागरिकांनी सहकार्य करायला हवे. या कामासाठी किल्ल्यांच्या पायथ्याशी राहणारया लोंकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी त्यांची सभा घेऊन त्यांना प्रबोधन करुन इतिहासाची माहिती देणे आवश्यक आहे. त्यांचे दुरध्वनी क्र., पत्ता आपल्याकडे घेणे त्यांना संवर्धनाची माहिती देणे, त्यांच्याकडुन कामे करुन घेणे.

२) दिशादर्शक / एतिहासिक माहिती / वळण व घाट रस्त्यांचे फलक:
गडावरुन काय काय पहावयासं मिळते ह्या बाबत तेथिल स्थानिक लोकांशी चर्चा करुन फलक लावणे.
मोठमोठ्या राष्ट्रीय, राज्य महामार्गावर, किल्ल्याकडे जाणारा दिशादर्शक फलक लावणे, किल्ल्यांपर्यंत जाणारा रस्ता दाखवणारा फलक, रेडियम स्टिकरसह लावावा, त्यावर किती कि.मि. किल्ल्या पर्यंतचा रस्ता आहे याचा उल्लेख असावा.
प्रत्येक किल्ल्यावर काय इतिहास घडला याबाबत उल्लेख असेल असा फलक असावा, जेणेकरुन गडाचा इतिहास सर्व लोकांसमोर पोहचेल.
काही किल्ल्यांवर जाण्यासाठी तसेच किल्ल्यांपर्यंत पोहचण्यासाठी अवघड वळणे / घाट रस्ते असल्याने तश्या जागेंवर "वळण/नो-ओर्व्हटेक" असे फलक लावण्यासाठी पी.डब्ल्यु. डि. / वन /पं. स. खाते यांचेकडुन मदत घ्यावी. 
मुख्य म्हणजे किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी तेथे मांसाहार- मद्यपान- धुम्रपान न करण्याबाबत फलक प्रतेक गडांवर तसेच पायथ्याशी असावा.

३) रस्ता= गडकिल्ल्यांपर्यंत किंवा ठराविक टप्प्यांपर्यंत डांबरी रस्ता बनवुन घेणे. यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अश्या विविध योजनांचा उपयोग करुन घेणे.

४) वाहनतळ= गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी थांबविण्याच्या ठिकाणी वाहनतळाची सोय करावी. व त्यासाठी ग्रामस्थांना पैसे द्यावेत. वाहनतळा शेजारी पिण्याच्या पाण्याची सोय उपल्बध करुन देणे.

५) गडांवर जाण्यासाठी पाहीरया तसेच संरक्षक कठडे उभे करणे= अवघड चढणावर संरक्षक कठडे, पी.सी.सी. किंवा विटा सिमेंटचे अंथरुण रस्ता.

६) दरवाजा= गडावर गेल्यावर प्रथम दर्शनी कमानीला दरवाजा बसवावा. तो सकाळी उघडावा व रात्री बंद करावा. रात्री गडावर कोणालाही प्रवेश देऊ नये. त्यासाठी रखवालदार नेमणे.

७) वीज= शक्य असल्यास गडावर वीज व्ह्यावी. जेणे करुन गडावरील पाण्याच्या मोटारी चालतील, मंदिरात इतरत्र प्रकाश दिवे लावता येतील. गडावर वीज असल्यास मोठे दिवे / अथवा सि.एल.फ. दिवे ऎतिहासिक वास्तु जवळ/अवघड वाटेवर, मंदिरात बसवणे.

८) ध्वज / ध्वजदंड= किल्ल्यावर ध्वजदंडासाठी जागा निश्चिती करुन त्याजागी उभारणी करणे. गडावर कायम स्वरुपी ध्वज फडकवणे. त्यासाठी नित्याने ध्वज बदलणे.

९) निवास व्यवस्था= प्रतेक गडावर गेल्यावर तेथे निवास व्यवथा असणे. खासदार/आमदार फंडातुन सांस्कृतिक भवन उभे करणे.

१०) छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा= सांस्कृतिक भवनामध्ये पुर्णाकृती पुतळा बसवणे. खर्चकरणे शक्य होत नसेल तर तैलचित्र त्या ठिकाणी घडलेल्या इतिहासाचे लावावे.

११) बागकाम= गडावरिल मोकळ्या जागेचे सर्वेक्षण करुन, ल्यांड-स्केपींग करुन वृक्षारोपण, गवत, छोटी फुल झाडे लावुन सुशोभीकरण करणे. पावसाळ्यापुर्वी खड्डे तसेच पाण्याची सोय करणे.

१२) गड स्वच्छता मोहिम= गावकरयांच्या मदतीने वेळोवेळी मोहिम आखुन स्वच्छता करणे. तट-बुरुजांवरिल झाडे तोडणे. कायम स्वरुपी एक यंत्रणा उभी करणे.

१३) एतिहासिक वास्तुंची दुरुस्ती= गडकोटांची पडझड झाल्याची नोंद वहीमध्ये / छायाचित्र स्वरुपात संकलन करुन ठेवणे. किल्ला कोणत्या खात्याच्या अखात्यारित आहे, त्या अनुशंगाने त्या-त्या खात्याकडे पाठपुरवठा करुन त्याची दुरुस्ती करावी.
उ.दा. पुरातत्व खाते/ वन खाते / खाजगी इ. पडलेल्या वास्तु उभ्या करणे.

१४) पाण्याच्या टाक्या= पावसाळ्यापुर्वी गाळ काढणे, पाण्यात घाण, दगड किंवा कचरा टाकू नये, त्यासाठी फलक लावणे. ग्रा.पं.जि.प., आमदार किंवा खासदार फंड यातुन त्या टाक्या दुरुस्त करुन घेणे.

१५) स्वछतागृह / कचरा व्यवस्थापन = पर्यटकासाठी स्वछतागृह उभी करणे. पुर्वीच्या जागी किंवा नविन ठिकाणी उभी करुन पाण्याची सोय करणे. तसेच गडावर देऊळ पासुन काही अंतरावर कचरापेटी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्याउपल्बध करावीत. तसेच गडांवर प्लास्टिक पिशव्याना बंदी घालावी.

१६) गडावर रखवालदार= गडाची व्यवस्था, बाग काम, पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी. तसेच रात्री/सकाळी दरवाजा बंद/उघडण्याकरिता रखवालदार ठेवणे.

१७) उत्सव= शिवजयंती, दुर्गदिन इ. सारखे उत्सव साजरे करणे.

८) वस्तुसंग्रालय= किल्ल्यावर तसेच त्याभोवती सापडणारया ऎतिहासिक वस्तू त्या-त्या गावाच्या मंदिरामध्ये अथवा संग्राहलय उभे करणे. 

ह्या आराखडा अंमलबजावणी व या कार्यास सुरवात झाली असुन ह्या कामामध्ये सहभागीहोण्याकरता अथवा मदतकरु इच्छीणारया तसेच देणगी देण्यासाठी लोकांनी खालील शिवभक्तांशी संर्पक साधावा.


अजित अरुणराव शिंदे : 9271777700      मुशीर जहीर अहमद : 9527346234 

सोमनाथ बिरुबा शेळके :  9096014040    विशाल अशोकराव रंदवे : 9975445859  

सुरज शेशेराव रणदिवे : 956175533         तेजपाल भगवानराव मुळे : 9623515830

           केतन चद्रंशेखर स्वामि : 8087919543              शैलेश शरद खडके : 9421155644

 

 

 

No comments:

About